Tue. Dec 7th, 2021

धोनी तुझ्या मुलीला kidnap करेन …

क्रिकेट विश्वात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनीचे देशातच नव्हे तर जगभारत प्रचंड फॅन्स आहेत. मात्र कॅप्टन कूलसोबतच त्याची मुलगी झिवाचे सुद्धा प्रचंड फॅन्स आहेत. कधी भक्तीगीत गाताना तर कधी वडिलांसोबत वेग-वेगळ्या भाषेत बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तिच्या वाढत्या फॅन फॉलोईंगमुळे अभिनेत्री प्रीती झिंटाने तिचे अपहरण करणार असल्याची गंमतीशीर धमकी ट्विट करत दिली आहे.

नेमकं ट्विटमध्ये काय म्हणाली प्रीती ?

Kings XI Punjab या संघाची मालक प्रीती झिंटाने महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या पोस्टच्या खाली प्रीतीने एक गंमतीशीर कॅप्शन दिले आहे.

मी कॅप्टन कूलची मोठी फॅन आहे. मात्र सध्या काही दिवसांपासून मी धोनीची चार वर्षाची मुलगी झिवाची मोठी फॅन झाली आहे.

मी झिवाचे अपहरण करू शकते असे मी धोनीला आवाहन करत आहे, अशी गंमतीशीर धमकी ट्विटरच्या माध्यमातून प्रीती झिंटाने दिली आहे.

झिवाचे व्हिडीओज चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होतात.

कधी भक्तीगीत तर कधी ABCD लिहितानाचे व्हिडीओ चाहत्यांना वेड लावणारी आहेत.

त्यामुळे अनेक चाहत्यांसह प्रीती झिंटा सुद्धा झिवाची मोठी फॅन असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *