Tue. Sep 27th, 2022

धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँक निवडणूक; भाजपला मोठा झटका

  धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनेलने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये, सात जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित दहा जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप प्राबल्य असलेल्या पॅनलने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.

  आमदार अमरिश पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील यांच्या चॅनलला बहुमत मिळाले आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र दहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यात सत्ताधारी पॅनलने पुन्हा एकदा सत्ता काबीज करत बँकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा ओबीसी मतदारसंघातून विजयी झाले. जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून ऍड. रोहिणी खडसेंचा विजय झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.