Wed. Jun 23rd, 2021

नगरसेवकांचं टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन

आतापर्यंत सरकारी कारभाराला कंटाळून अथवा इतर कारणांमुळे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन पाहिले आहे.

परंतु धुळ्यातील एका नगरसेवकानेच चक्क टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे.

विस्कळीत पाणी पुरवठ्याला कंटाळून या नगरसेवकाने हे पाऊल उचलले.

नगरसेवक सईद बेग, अब्दुल गणी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आपली नाराजी व्यक्त केली. हे दोन्ही नगरसेवक एमआयएम पक्षाचे आहेत.

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला वारंवार सांगूनही पाणी वितरणाच्या व्यवस्थेत सुधारणा होत नाही.

पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागतो.

झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी हे आंदोलन केल्याचं नगरसेवकांनी सांगितले.

पाणी वितरणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास अजून तीव्र आंदोलन करु असा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *