धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

सरकारी जमीन हडप केल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. तर कोर्टानं आमची बाजू न ऐकताच आदेश दिल्याचं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे. “सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला. असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पूस गावातील सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती,
ती जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली.
असं आरोप करीत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नसताना दबाव आणून ही जमीन नावे केल्याचं याचिकेकर्त्याचं म्हणणं आहे.
यावर औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हायकोर्टाने हा निर्णय दिल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी भर पडली आहे.
तर कोर्टानं आमची बाजू न ऐकताच आदेश दिल्याचं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे.