Sat. Jul 31st, 2021

आता बरा होऊ शकतो मधुमेह पायाचा संसर्ग…

डायबेटिक फूट अल्‍सर्सच्‍या आजारावर उपचार..

मुंबई, २४ सप्‍टेंबर २०२० : सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सने जगामध्‍ये पहिल्‍यांदाच न्‍यू केमिकल एण्टिटी (एनसीई) ‘वोक्‍सहिल®’ सादर केली. दुहेरी कार्यरत यंत्रणा असलेले ”वोक्‍सहिल®’ हे डायबेटिक फूट अल्‍सर्सच्‍या उपचारामधील महत्त्वाचे उत्पादन असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जागतिक स्‍तरावर पाय विच्‍छेदन करण्‍यात येणा-या लाखो मधुमेही व्‍यक्‍तींचे जीवन वाचण्याची शक्यता निर्माण झालीय. पायाला गंभीर संसर्ग झाल्‍यामुळे हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ५ पैकी एका मधुमेही रूग्‍णाचे पाय विच्‍छेदन करावे लागते..मात्र, आता याबाबत निश्चित उपाय निर्माण झाल्याचा दावा सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सचे अध्‍यक्ष,व्‍यवस्‍थापकीय संचालक एस. डी. सावंतयांनी केला आहे.

 • मधुमेहाने पीडित २५ टक्‍के व्‍यक्‍तींना डायबेटिक फूट अल्‍सरचा त्रास असतो.

 • गंभीर संसर्ग झालेल्‍या ५ पैकी एका व्‍यक्‍तीचे पाय विच्‍छेदन करावे लागतं.

• जर्मन तंत्रज्ञान भागीदार ‘सायटोटूल्‍स एजी’सोबत सहयोगाने विकसित केले आहे.

• भारत व जगभरात लाखो व्‍यक्‍तींचे होणारे पाय विच्‍छेदन टाळण्‍यामध्‍ये मदत होणार आहे.

सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सने जगामध्‍ये पहिल्‍यांदाच न्‍यू केमिकल एण्टिटी (एनसीई) ‘वोक्‍सहिल®’च्‍या सादरीकरणाची घोषणा केली. दुहेरी कार्यरत यंत्रणा असलेले ‘वोक्‍सहिल®’ हे डायबेटिक फूट अल्‍सर्सच्‍या उपचारामधील अद्वितीय उत्‍पादन आहे. हे उत्‍पादन जागतिक स्‍तरावर पाय विच्‍छेदन करण्‍यात येणा-या लाखो मधुमेही व्‍यक्‍तींचे जीवन वाचवेल. 

डब्‍ल्‍यूएचओचा अंदाज आहे की, पुढील १० वर्षांमध्‍ये १० कोटी भारतीयांना मधुमेह होण्‍याचा धोका आहे. मधुमेहांच्‍या इतर आजारांमध्‍ये डायबेटिक फूट अल्‍सर हा भारतामध्‍ये सर्वाधिक आढळून येणारा आजार आहे. डायबेटिक फूट अल्‍सर्स हा उपचार न होऊ शकणारा आजार आहे, हे पाहता रूग्‍णाच्‍या जीवनाच्‍या दर्जावर परिणाम होण्‍यासोबत ओले गँग्रिन, सेल्युलायटिस, गळू आणि नेक्रोटाइझिंग फॅसिआइटिस यासारखे आजार होण्‍याची शक्‍यता आहे. ज्‍यामुळे पूर्णत: किंवा अंशत: पाय विच्‍छेदन करावे लागेल. डेटामधून निदर्शनास येते की, मधुमेहाने पीडित २५ टक्‍के व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये डायबेटिक फूट अल्‍सर होण्‍याचा धोका आहे.

पायाला गंभीर संसर्ग झाल्‍यामुळे हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आलेल्‍या ५ पैकी एका मधुमेही रूग्‍णाचे पाय विच्‍छेदन करावे लागते. ज्‍यामुळे कुटुंबाच्‍या जीवनमानावर परिणाम होतो.याप्रसंगी बोलताना सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. एस. डी. सावंत म्‍हणाले, ”सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍समध्‍ये आम्‍हाला भारतात झपाट्याने वाढत असलेल्‍या पाय विच्‍छेदनांच्‍या प्रमाणाबाबत चिंता होती आणि आमची या गोष्‍टीला प्रतिबंध करणारे औषध विकसित करण्‍याची इच्‍छा होती. पंधरा वर्षांपूर्वी आम्‍ही जर्मनीतील सायटोटूल्‍स एजीसोबत सहयोग केला. त्‍यांच्‍याकडे डायबेटिक फूट अल्‍सरच्‍या उपचारासाठी ही आशादायी उपचारपद्धत होती. आम्‍हाला भारतातील डायबेटिक फूट अल्‍सरने पीडित व्‍यक्‍तींमध्‍ये आशेचा किरण जागृत करण्‍यास अत्‍यंत आनंद होत आहे. 

 जागतिक स्‍तरावरील पेटण्‍टेड उत्‍पादन ‘वोक्‍सहिल®’ टॉपिकल सोल्‍यूशन डायबेटिक फूट अल्‍सरचा उपचार करण्‍यामध्‍ये गुणकारी आहे. ‘वोक्‍सहिल®’मध्‍ये एनसीई, डायपरोक्‍सोक्‍लोरिक अॅसिड आहे, ज्‍याला डीपीओसीएल असे म्‍हणतात. ‘वोक्‍सहिल®’मध्‍ये कार्य करण्‍याची दुहेरी यंत्रणा आहे, म्‍हणजेच ते ग्रॅम पॉझिटिव्‍ह व ग्रॅम निगेटिव्‍हविरोधात अॅण्‍टीबॅक्‍टेरिअल म्‍हणून कार्य करते आणि फायब्रोब्‍लास्‍ट पेशींच्‍या वाढीसाठी देखील मदत करते. ज्‍यामुळे जखमा पूर्णपणे ब-या होण्‍यामध्‍ये मदत होते. 

भारतभरात १५ हून अधिक वैद्यकीय चाचणी केंद्रांमध्‍ये ‘वोक्‍सहिल®’वर करण्‍यात आलेल्‍या यादृच्छिक वैद्यकीय चाचण्‍यांमधून स्‍पष्‍ट झाले की, उपचार होऊ न शकणा-या डायबेटिक फूट अल्‍सरने पीडित ९० टक्‍क्‍यांहून अधिक रूग्‍णांमध्‍ये अल्‍सरच्‍या आकारात घट झालेली दिसण्‍यात आली आणि यापैकी ७५ टक्‍के रूग्‍ण कोणत्‍याही सुरक्षितता उतींशिवाय ६ ते ८ आठवड्यांमध्‍ये पूर्णपणे बरे झाले. डेटा व चाचणीच्‍या निष्‍पत्ती भारतीय नियामक प्राधिकरणाकडे सादर करण्‍यात आले आणि सेंटॉर फार्मास्‍युटिकलला ‘वोक्‍सहिल®’साठी उत्‍पादन व विपणन मान्‍यता मंजूर करण्‍यात आली. 

‘वोक्‍सहिल®’चे सह-नवप्रवर्तक आणि जर्मनीमधील सायटोटूल्‍स एजीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्क-अँड्रे फ्रेबर्ग म्‍हणाले, ”’वोक्‍सहिल®’ने भारतात तिस-या टप्‍प्‍यातील वैद्यकीय चाचण्‍या पूर्ण केल्‍या आहेत. या चाचण्‍यांमधून हे उत्‍पादन उपचार करता येऊ न शकणा-या डायबेटिक फूट अल्‍सर्सने पीडित रूग्‍णांच्‍या जखमांवर त्‍वरित व गुणकारी उपचार होण्‍यामध्‍ये साह्यभूत असल्‍याचे दिसून आले. 

‘वोक्‍सहिल®’चे सह-नवप्रवर्तक आणि जर्मनीमधील सायटोटूल्‍स एजीचे मुख्‍य वैज्ञानिक अधिकारी डॉ. डर्क कैसर म्‍हणाले, ”’वोक्‍सहिल®’ हे भारतीय-जर्मन सहयोगामधून विकसित करण्‍यात आलेले नोव्‍हेल औषध आहे. हे औषध डायबेटिक फूट अल्‍सरच्या केल्या जाणा-या व्‍यवस्‍थापनामध्‍ये बदल घडवून आणेल आणि विच्‍छेदनाला प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करेल.” डॉ. कैसर पुढे म्‍हणाले की, तिस-या टप्‍प्‍यातील वैद्यकीय चाचण्‍या युरोपमध्‍ये सुरू होत्‍या आणि दुस-या टप्‍प्‍यातील वैद्यकीय चाचण्‍यांमधील निष्‍पत्ती भारतीय वैद्यकीय चाचण्‍यांच्‍या निष्‍पत्तींप्रमाणेच होती. पूर्ण न होऊ शकणा-या वैद्यकीय गरजेसाठी सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍सचे हे अग्रणी प्रयत्‍न भारताचा आत्‍मनिर्भर देश आणि फार्मा सुपर-पॉवर म्हणून दर्जा वाढवतात.

‘वोक्‍सहिल®’ महिनाअखेरपर्यंत संपूर्ण देशभरात उपलब्‍ध असेल.  सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍स बाबत १९७८ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली सेंटॉर फार्मास्‍युटिकल्‍स ही प्रीस्क्रिप्‍शन्‍सनुसार भारताची ३४वी सर्वात मोठी फार्मास्‍युटिकल कंपनी आहे. सेंटॉर ही एपीआय, आरअॅण्‍डडी, सीआरएएम, वैद्यकीय संशोधन व सुत्रीकरणांमध्‍ये प्राविण्‍यता असण्‍यासोबत ११० देशांना औषधे निर्यात करणारी पूर्णत: एकीकृत फार्मास्‍युटिकल कंपनी आहे. सेंटॉरकडे यूएसएफडीएद्वारे मान्‍यताकृत जागतिक दर्जाचे वैद्यकीय संशोधन, एपीआय व उत्‍पादन सुविधा आहेत. सेंटॉर भारताचा पहिल्‍या क्रमांकाचा अॅण्‍टी-कोल्‍ड ब्रॅण्‍ड ‘सिनारेस्‍ट’चे विपणन करते.

या ब्रॅण्‍डने गेल्‍या सहा वर्षांसाठी सलग ‘एडब्‍ल्‍यूएसीएस – ब्रॅण्‍ड ऑफ दि इअर अवॉर्ड’ जिंकला आहे.  सायटोटूल्‍स एजी बाबतसायटोटूल्‍स एजी ही जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी पेशीवाढ यंत्रणेवरील मूलभूत जैविक संशोधनावर लक्ष केंद्रित करते आणि मृतपेशींचा लक्षणांऐवजी आजाराच्‍या कारणाचे उपचार करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अद्वितीय थेरपींमध्‍ये उपयोग करते. कंपनीने आजार सुधारित उपचाराची प्रबळ व वैविध्‍यपूर्ण रेंज विकसित केली आहे, ज्‍यामध्‍ये प्रोप्रायटरी लहान रेणू व जीवशास्‍त्रांचा समावेश आहे. यामध्‍ये डर्माटोलॉजी, कार्डियोलॉजी व एंजियोलॉजी, युरोलॉजी व ऑन्‍कोलॉजीमध्‍ये नवीन उपचार पद्धती देण्‍याची क्षमता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *