Sun. Aug 1st, 2021

खंजीर खुपसण्याची पुनरावृत्ती?

1978 मध्ये शरद पवारांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता तो वसंतदादा पाटील यांनी…

अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं यावरुन अजित पवारांवर टीका होत आहे. शिवसेना खासदार आणि शिवसेनेची सत्ता व्हावी, यासाठी आग्रही असणारे संजय राऊत यांनी अजित पवारांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही केला. मात्र यामधून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसून येतंय. पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप अजित पवार यांचे काका, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही झाला आहे. 1978 मध्ये शरद पवारांवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता तो वसंतदादा पाटील यांनी…

इतिहासाची पुनरावृत्ती?

शरद पवार, यशवंत चव्हाण वसंतदादा पाटील हे  एकाच पक्षात म्हणजे समाजवादी काँग्रेसमध्ये होते.

वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री तर शरद पवार गृहमंत्री होते.

वसंतदादा हे इंदिरा गांधीना मदत करत असल्याचा आरोप यशवंतराव चव्हाण यांनी केला आणि शरद पवारांना आमदार फोडण्याचा सल्ला दिला.

तत्कालीन इंदिरा काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस अशा दोन्ही काँग्रेसला पवारांनी फोडलं.

दोन्ही पक्षांच्या 20-20 आमदारांना पवारांनी फोडलं

या आमदारांच्या आणि जनता पक्षाच्या मदतीनं शरद पवारांनी सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले.

त्यावेळी त्यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप वसंतदादा यांनी केला होता.

त्यामुळे अजित पवार यांनी काकांच्या पावलावर पाऊल टाकलं असल्याचं सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *