Sun. Oct 24th, 2021

#हॅप्पीबर्थडेARRehman: रेहमानचं ‘हे’ मराठी गाणं तुम्ही ऐकलंयत का?

भारताला दोनदा आॉस्कर पुरस्काराच्या शिखरावर नेणारे जगप्रसिद्ध संगितकार ए. आर रेहमान यांच्या आज वाढदिवस. 6 जानेवारी 1967 साली तमिळनाडू येथे त्यांचा जन्म झाला. 1987 पासून त्यांच्या करिअरला सुरूवात झाली. ‘स्लमडॉग मिलेनेअर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी आणि इतर भाषांमध्येही अनेक दर्जेदार चित्रपट संगीत त्यांनी केलंय. ‘रोजा’, ‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘रंगीला’, ‘लगान’, ‘रंग दे बसंती’, ‘स्वदेस’ अशा अनेक हिंदी तसंच तामिळ सिनेमांना खास रेहमानिक टचने त्यांनी सजवलं.

जाहिरातीच्या संगीत निर्मितीचं काम करणारे ए.आर. रेहमान (A R Rehman) पाश्चात्य संगीत शिकण्यासाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते.

त्याचवेळी तामिळ सिनेसृष्टीतील दिग्गज फिल्ममेकर मणीरत्नम हे इलय्याराजा या महान संगीतकाराशी वाद झाल्यामुळे नव्या संगीतकाराच्या शोधात होते.

योगायोगाने त्यांची भेट नवख्या रेहमानशी झाली. आपल्या ‘रोजा’ या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी त्यांनी रेहमानला दिली.

या सिनेमातील सगळ्या गाण्यांना मिळून जेमतेम 25 हजार रुपये फक्त त्यांनी रेहमानला देण्याचं मान्य केलं.

मात्र हवं तसं संगीत देण्याची मोकळीक दिली.

रेहमनने यानंतर परदेशगमनाचा बेत रद्द करून या सिनेमाच्या संगीतावर लक्ष केंद्रीत केलं आणि या सिनेमातील संगीताने चमत्कार घडवला.

जगाला नवा संगीतकार मिळाला. तामिळच नव्हे, तर देशभरात त्याच्या संगीतकाराने धुमाकूळ घातला.

परदेशातही रेहमानच्या अनेक गाण्यांनी लोकांना वेड लावलं.

रेहमानला ‘मोत्झार्ट ऑफ मद्रास’ ही उपाधीच दिली गेली.

तेव्हापासून मणीरत्नम आणि रेहमान यांची जोडी हे सिनेसृष्टीतील अद्वैत बनलं. रेहमानने एकाहून एक जबरदस्त गाणी रचली. मात्र मणीरत्नमसाठी त्याने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना तोड नाही, हे खरं… तामिळ, हिंदीच्या पुढे जात रेहमानने हॉलिवूडच्या सिनेमांनाही संगीत दिलं आणि तो वैश्विक पातळीवर पोहोचला.

पण ज्या सिनेमाने रेहमानच्या सांगीतिक प्रवासाचा शुभारंभ केला, त्या रोजा सिनेमातील अनेक गाणी त्यावेळी मराठीतदेखील तयार करण्यात आली होती. सुरेश वाडकर आणि जगदीश खेबुडकरांच्या मदतीने ‘रोजा जानेमन’, ‘दिल है छोटासा’, ‘ये हसीं वादियाँ’ यांसारखी गाणी मराठीतही तयार केली…

दोन दशकात आपल्या दर्जेदार कलाकृतीने प्रक्षकांच्या मनात आपली वेगळी प्रतिमा त्यांनी बनवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *