Mon. May 27th, 2019

श्रीरामाचं नाव घेणाऱ्यांना दीदी जेलमध्ये टाकतात- पंतप्रधान मोदी

दीदींना श्रीरामचंद्रांच्या नावाचंही वावडं आहे. त्यामुळे ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांना दीदी कैदेत टाकत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आहे. प. बंगालच्या तामलूक येथे प्रचारसभेत पंतप्रधानांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला.

बंगालमध्ये दडपशाहीचं सरकार– नरेंद्र मोदी

बंगालमध्ये दडपशाही सुरू आहे. गुंडगिरीचं राज्य सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपण फोनी वादळाबद्दल चर्चा करण्यासाठी दोनदा ममतादीदींना फोन केला होता.

मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही, की return call ही केला नाही.

पंतप्रधान कार्यालयाच्या कोणत्याही पत्रांना ममता बॅनर्जींकडून उत्तर दिलं जात नाही.

‘जय श्री राम’ म्हणणाऱ्यांना ममता बॅनर्जी थेट जेलमध्ये टाकत आहे, असा आरोप मोदींनी केला.

 

अराजकीय मुलाखतीत ममता दीदींबद्दल काय म्हणाले होते पंतप्रधान?

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान आज सुरू आहे. यंदा सातही टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होतंय. त्यामुळे भाजप बंगालमध्ये आक्रमकपणे प्रचार करतंय. मोदी यांनी मध्यंतरी अभिनेता अक्षय कुमार याला दिलेल्या अराजकीय मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असल्याचं विधान मोदी यांनी केलं होतं. त्यांच्याकडून आपल्याला मिठाई येत असल्याचंही ते म्हणाले होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मात्र मोदींनी ममता दीदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यामुळे यंदा भाजपला बंगालमध्ये सत्तास्थपनेची संधी मिळणार का, हे लवकरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *