Fri. May 7th, 2021

#NRC मुद्द्यावरून मोदी आणि शहा यांच्यात मतभेद- बाळासाहेब थोरात

#NRC च्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलं आहे. CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘जनमत NRC च्या विरोधात आहे. NRC च्या मुद्द्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातच मतभेद आहेत’ असं वक्तव्य थोरात यांनी अमरावतीमध्ये केलं. ते काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी अमरावतीमध्ये आले होते

Axis बँकेच्या प्रकरणाची चौकशी करणार- थोरात

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यरत असणाऱ्या ॲक्सिस बँकेत मोठ्या दोन लाखाच्या वर खाती फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून काढून ॲक्सिस बँकेत वळते केली होती यावर बोलताना थोरात यांनी याप्रकरणाची आम्ही चौकशी करणार असून नेमके कुठल्या कारणासाठी खाती ट्रान्सफर केली व त्यावर योग्य कारवाई करू असे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *