Sat. Oct 24th, 2020

MIM- वंचितच्या स्वतंत्र लढतीचा युतीला फायदा?

मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असणारं औरंगाबाद MIM ने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुरुंग लावून काबीज केलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा MIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत MIM आणि वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील हे खासदार झाले.

आधी विधानसभेनंतर नंतर लोकसभेतही शिवसेनेचा बालेकिल्ला MIM ने काबीज केला.

आता हा किल्ला ताब्यात ठेवणे हेच MIM समोर मोठं आव्हान आहे. कारण वंचित आणि MIM च्या फारकतीचा फायदा युतीला होणार, अशी चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करतायत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याचा फायदा MIM ला झाला.

त्यामुळे इम्तियाज जलील 2014 मध्ये आमदार झाले.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे.

औरंगाबादमध्ये MIM च्या जागेवर वंचितनेही दावा टाकल्याने वंचित आणि MIM च्या आघाडी बिघाडीचे हेदेखील एक कारण आहे.

एकीकडे शिवसेना-भाजप एकत्र निवडणुकीला समोर जातेय, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत एकत्र असलेले वंचित आणि MIM वेगवेगळे लढत असल्याने युतीच्या उमेदवाराबरोबर वंचितच्या उमेदवाराचंही आव्हान एमआयएमसमोर असणार आहे.

औरंगाबाद शहरात 3 विधानसभा मतदारसंघांपैकी औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मुस्लिम व दलित मतदारांची संख्या जवळपास 60 टक्क्यांपर्यंत आहे.

गेल्यावेळी ‘मध्य’ मधून इम्तियाज जलील तर ‘पूर्व’मधून अतुल सावे निवडून आले होते.

पूर्व मतदारसंघात MIM 2 नंबरला होती तर शिवसेना आणि काँग्रेस 4 नंबरवर.

औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट दुसऱ्यांना निवडून आले होते.

त्यांनाही यंदा स्वपक्षियांनी आव्हान निर्माण केलंय.

शिवसेना आपला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेईल का? एम आय एम आपली जागा कायम ठेवेल का? की वंचित आपले खाते उघडेल हे 24 ऑक्‍टोबरला स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *