Fri. Dec 3rd, 2021

राज्यातील कोरोनामृत्यूंच्या सरकारी आकडेवारीत तफावत

राज्यातील कोरोनामृत्यूंच्या सरकारी आकडेवारीत तफावत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . राज्याच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्याभरात तब्बल वीस हजार मृत्यूंची नोंद केली आहे. तांत्रिक कारणांचा आधार घेऊन मृत्युसंख्या कमी दाखवली गेली होती. गेल्या सप्टेंबरपासून जिल्हास्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीत आणि राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीत साडेअकरा हजारांहून आधिक मृत्यूंची तफावत होती. मे महिन्यापासून ताळमेळ घालून नव्या नोंदी करण्यास प्रारंभ केल्याचेही आरोग्य विभागाच्या खुलाशात समोर आले आहे. त्यानुसार एका महिन्यात तब्बल २० हजार ५३९ मृत्यूंच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. याच कालावधीमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ८ हजार ५०० मृत्यूंपेक्षा हे आकडे वेगळे आहेत. गेल्या पंचेचाळीस दिवसांचा आढावा घेतल्यास, ताळमेळ घालून करण्यात आलेल्या मृत्यूंच्या नोंदीचा आकडा २५ हजारांवर गेल्याचे सरकारी आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या प्रकरणी संबंधितांची झाडाझडती घेऊन, योग्य पद्धतीने आकडे जाहीर करण्याचे आदेश दिले होते. नंतर आरोग्य विभागाने खुलासा करताना, मृत्यूच्या आकडेवारीचा ताळमेळ दर पंधरा दिवसांनी घालण्यात येतो, असेही म्हटले होते. शासकीय यंत्रणा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात व्यग्र असल्याने; तसेच तांत्रिक बाबींमुळे या नोंदी करण्याचे राहून गेल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *