Thu. May 19th, 2022

शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी का पळतेय चौकशीपासून ?

  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित क्रुझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणात २५ कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच आर्यनला अटक केल्यापासून शाहरूख खानची मॅनेजर पूजा दादलानी खंडणी प्रकरणाची मुख्य साक्षीदार ठरू शकते. त्यामुळे पूजा दादलानीसुद्धा तपासाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

  खंडणी प्रकरणाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या (एसआयटी) पथकाने पूजा दादलानीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यादरम्यान पूजा दादलानीला दोनदा समन्स बजावण्यात आले. दुसऱ्यांदा समन्स बजावूनही पूजा चौकशीला हजर राहिली नाही. त्यामुळे खंडणी प्रकरणी पूजाने अद्याप जबाब नोंदविला नसल्यामुळे समीर वानखेडेंच्या खंडणी प्रकरणाची चौकशी करण्यात अडचणी येत आहेत. दोनदा चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे एसआयटी आता पूजा ददलानीला तिसऱ्यांदा नोटीस बजावणार आहे.

  क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. तसेच पूजा ददलानीने किरण गोसावी आणि सॅम डिसूझाला भेटायला गेली होती. ज्या भागातील पूजा ददलानी यांच्या गाडीचे सीसीटव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले त्याच लोअर परळच्या भागात २५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याला आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यामुळे पूजा ददलानी या खंडणी प्रकरणाचा मोठा पुरावा आहे. त्यामुळे पूजा ददलानीला समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे एनसीबी, मुंबई पोलीस सारेच अडकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.