‘दिल… दोस्ती’ फेम ‘हे’ दोघे लवकरच लग्नबेडीत?

मराठी मालिकाविश्वामध्ये ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. तरूणांमध्ये या मालिकेच्या एपिसोड्सची कट्ट्यावर खास चर्चा रंगायची. अशीच काहीशी चर्चा रंगतेय ती म्हणजेच आपले सुजय आणि रेश्मा एकमेकांशी लग्न करणार आहेत. या मालिकेमध्ये काम करणारे सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे एकमेकांच्या प्रेमात पडले असून आता लवकरच ते दोघे लग्नबेडीत अडकणार आहेत,अशी चर्चा सध्या रंगत आहे.

दिल.. दोस्ती … ते प्रेमाचा प्रवास

‘दिल.. दोस्ती.. दुनियादारी’ या मालिकेमधून तरूण वर्गाला प्रेमात पाडणारे सुजय  आणि रेश्मा एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा होती.

आणि आता लवकरच हे दोघे लग्नबेडीत अडकणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.

‘दिल… दोस्ती’ च्या मालिकेच्या शूटिंगदरम्यान यांचं सूत जुळलं.याचं रूपांतर आता लवकरच लग्नात होत असल्याचं कळत आहे.

त्यानंतर ‘अमर स्टुडिओ’ यांच्या नाटकामधूनही हे दोघेजण परत एकदा रसिकांच्या भेटीला आले होते.

या जोडीला खास पसंती मिळतेय. दोघांचेही एकत्रित फोटो सोशल मिडीयावर खास पसंती मिळवत आहेत.

त्यांच्या लग्नाविषयीची अधिकृत माहिती दोघांकडूनही मिळालेली नाही.तेव्हा त्यांच्या लग्नाविषयीची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.

Exit mobile version