Sat. Jul 31st, 2021

TV अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Dil Toh Happy Hai Jee actress Sejal Sharma commits suicide) ‘दिल तो हॅप्पी है जी’ या डेली सोपमध्ये (Daily Soap Dil Toh Happy Hai Jee) सेजल अंशच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

काय घडलं नेमकं?

सेजल शर्मा 2017 साली राजस्थानातील उदयपूर येथून मुंबईत अभिनेत्री बनायला आली होती.

ती मिरारोडला शिवार गार्डन भागातील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती.

शुक्रवारी 24 जानेवारी रोजी सकाळी आपल्या घरातील पंख्याला गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली.

View this post on Instagram

#spontaneous #musiclovers #dancelovers #bollywoodlove

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

का केली आत्महत्या?

प्रेमप्रकरणातून सेजलने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. (Suicide note of Sejal Sharma)

‘मी गेल्या दीड महिन्यापासून नैराश्यग्स्त आहे. मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नका.’ असं या पत्रात तिने लिहिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

तिने नेमकं आत्महत्येचं पाऊल का उचललं असावं, याबद्दल अजून खुलासा झालेला नाही.

बालपणापासून अभिनेत्री बनायची इच्छा असलेली सेजल 2017 साली राजस्थानातून मुंबईला आली होती.

‘दिल तो हॅप्पी है जी’ हा तिचा पहिला ब्रेक होता.

पोलिसांनी सेजलचा मृतदेह ताब्यात घेऊन भाईंदरच्या पं. भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी (Post Mortem) पाठीवला आहे.

Depression मुळे आणखी एका सेलिब्रिटीने आत्महत्या केल्यामुळे या ग्लॅमरमागचं depression हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *