Sun. Sep 22nd, 2019

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि रेश्मा बागल शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जवळील असलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असून आठ दिवसात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

0Shares

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जवळील असलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असून आठ दिवसात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. असं सांगण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या करमाळाच्या रेश्मा बागल – कोलते हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून 20 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला पुन्हा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. सोलापूरातील बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील विधालसभेची जागा शिवसेनेत येत असल्याने ते हा प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत राष्ट्रवादीची उमेदवार निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे हजर नव्हते. त्यामुळे ते सेनेत प्रवेश करणार हे निश्चित मानलं जातं आहे. सोपल यांनी बार्शीत कार्यकर्ता मेळावा देखील पार पडला आहे.

तर राष्ट्रवादीच्या नेत्या करमाळाच्या रेश्मा बागल – कोलते हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून 20 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *