Jaimaharashtra news

बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक संतप्त; दिली बंदची हाक

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये

गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हा विशेष लेखा परिक्षक व्ही व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला. बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार तर सुमारे 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार

झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

 

दरम्यान, आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यातूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बार्शी बंदची हाक दिली.

Exit mobile version