Wed. Jun 29th, 2022

‘राज यांच्या सुरक्षेसाठी राज्य सक्षम’ – दिलीप वळसे-पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या राजकारणावरून नवा वाद उफाळला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात तसेच ठाण्यतील उत्तरसभेत राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. मशिदींवरील भोंगा उतरवण्याचा मुद्दा राज ठाकरेंनी हाती घेतला आहे, यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अनेक संघटनांकडून त्यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज ठाकरेंना विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचं संरक्षण करण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्यासारखं आहे, असे पाटील म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्र अशांत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीकाही दिलीप वळसे पाटलांनी केली आहे.

भोंग्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्र सरकारकडून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचं बोललं जात होतं. मात्र, राज ठाकरे यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे असं म्हणत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्यासारखं आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. याप्रकरणी, छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत, लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा पीएफआयने मनसेला दिला होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून अशी धमकी आल्यामुळे राज यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवणार अशी चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.