अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेेश, आव्हाडांविरूद्ध निवडणूक लढणार

विधानसभा निवडणुका अगदी जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद हिने शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिला कळवा मतदार संघाकडून शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची मानली जात आहे.

शिवसेनेसाठी कळवा मतदार संघ महत्वाचा…

या निवडणूकीत दिपाली सय्यद आव्हाडांच्या विरोधात लढणार आहे. कळवा मतदार संघासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिपाली सय्यदने काल रात्री मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत पक्षप्रवेश केला आहे . ठाकरेंनी तिला शिवबंधन बांधून तिचे पक्षात स्वागत केले आहे. तसेच कळवा मतदार संघाकडून तिची उमेदवारी जाहीर केली आहे.

कळवा मतदार संघ हा जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला मानला जातो. यापुर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांनी अधिक मतांनी शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांना पराभूत केले होते.

मुस्लीम बांधवांचा मुंब्रा भागातून आव्हाडांना मोठ्या प्रमाणात पाठींबा असल्याने ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने दिपाली सय्यदला निवडणूकीच्या रणांगणात उतरवले आहे.

आता शिवसेनेचा हा निर्णय काय बदल घडवून आणतो  हे पहावं लागेलं

दिपालीचा निवडणूकीतील सहभाग…

दिपाली सय्यद यांनी २०१४ मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. अभिनेत्री दिपाली सय्यद जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.

.#shivsena #deepalisayed pic.twitter.com/RmuKutRmbi

— Deepali Sayed (@deepalisayed) October 4, 2019

Exit mobile version