Fri. Jun 21st, 2019

माधुरी-आमिरच्या ‘या’ सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

215Shares

बॉलिवूडमध्ये एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे सुपरहिट सिनेमांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे.

जान्हवी कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘धडक’ आणि शाहिद कपूरचा आगामी सिनेमा ‘कबीर सिंह’ याचे ताजे उदाहरण आहे.

आता आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आमिर खान आणि माधुरी दीक्षितच्या तुफान गाजलेला सिनेमा ‘दिल’चा रिमेक लवकरच पडद्यावर दिसणार आहे.

1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तरूणाईला वेड लावले होते. या सिनेमाची गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली होती.
दिग्दर्शक इंदर कुमार दीर्घकाळापासून ‘दिल’च्या रिमेकचे प्लानिंग करत होते.

आता तर या रिमेकची स्क्रिप्टही तयार आहे. असे खुद्द इंदर कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मी खूप दिवसांपासून ‘दिल’चा रिमेक बनवू इच्छित होतो. पण आता आमची स्क्रिप्ट तयार आहे. ‘दिल अगेन’ असे या रिमेकचे नाव असणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
या रिमेकमध्ये माधुरी व आमिरलाच घेणार का? असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

नाही, मी या सिनेमात 2 नवे चेहरे घेणार आहे. पण अद्याप कास्टिंग ठरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘दिल अगेन’ची रिलीज डेट सांगण्यासही त्यांनी नकार दिला.

रिलीज डेटबद्दल मी काहीही सांगणार नाही. कारण यामुळे दबाव येतो. सध्या मी ‘टोटल धमाल’च्या पोस्ट प्रॉडक्शन कामात आहे.

या नव्या प्रोजेक्टबद्दल तूर्तास मी काहीही सांगू शकत नाही. ‘दिल अगेन’चे शूटींग लवकरच सुरु होईल, असे इंदर कुमार म्हणाले आहेत.

215Shares

Leave a Reply

%d bloggers like this: