Tue. Jun 18th, 2019

मार्शल आर्ट्स मास्टर ‘ब्रूस ली’ वर आता बायो-पिक

22Shares

जगाला आपल्या सिनेमांमधून मार्शल आर्ट्सची ओळख करून देणाऱ्या ब्रुस ली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा मृत्यू जरी पूर्वीच झाला असला, तरी आता त्याचं आयुष्य उलगडणाऱ्या सिनेमाच्या रूपातून तो पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर.  ‘लिटिल ड्रॅगन’ असं या सिनेमाचं नाव असेल.

बऱ्याच वर्षांनी शेखर कपूर करणार दिग्दर्शन

ब्रूस ली सारख्या ऍक्शन स्टारमुळे सिनेमामध्ये अॅक्टिंगसोबतच अॅक्शनलाही प्राधान्य मिळायला सुरूवात झाली.

ब्रुस लीच्या अॅक्शनने सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ब्रूस लीच्या जीवनावर सिनेमा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

यापूर्वी ब्रुस लीच्या आयुष्यावर ‘द ग्रँड मास्टर’ आणि ‘आयपी मॅन’ हे सिनेमे येऊन गेले आहेत.

ब्रूस ली चं आयुष्य रहस्यमयी होतं. त्याच्या मृत्यूचं गूढही अजून उकललेलं नाही.

त्याच्याविषयी मिळणारे संदर्भ हे फार मर्यादित आहेत.

तेव्हा त्याचं आयुष्य पडद्यावर मांडताना दिग्ददर्शक शेखर कपूर यांची प्रतिभा पणाला लागणार आहे हे नक्की.

यापूर्वी शेखर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये ‘मासूम’, ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘बँडिट क्वीन’ हे तीनच सिनेमे दिग्दर्शित केले. मात्र हे तीनही सिनेमे मास्टरपीस म्हणून गणले जातात.

हॉलिवूडमध्येही ‘एलिझाबेथ’ सारखा सिनेमा करून शेखर कपूर यांनी वाहवा मिळवली होती.

त्यानंतर अनेक वर्षं शेखर कपूर वेगवेगळे प्रोजेक्ट्स घोषित करत होते. मात्र ते पूर्ण होऊ शकत नव्हते. त्यामुळे ब्रूस ली च्या जीवनावरील सिनेमाची घोषणा केल्यावर हा सिनेमा कधी पाहायला मिळेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण आहे.

22Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *