दिग्दर्शक-गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन

पुणे: मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘आरारारा खतरनाक’ या त्यांच्या गाण्याने रसिकांना प्रचंड भुरळ घातली.’शिवबा ते शिवराय’ दृकश्राव्य कार्यक्रम, ‘जीवन यांना कळले हो’ स्टेज रियालिटी शो चे त्यांंनी लेखन आणि दिग्दर्शन केले होते. ‘सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रणित यांनी केले होते. अभिनेते प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते.

फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही मालिकेचे लेखन दिग्दर्शन केले होते. तसेच ‘लक्ष्य’ या लोकप्रिय मालिकेचे लेखनही त्यांनी केले होते.

Exit mobile version