Wed. Jul 28th, 2021

धक्कादायक! मनपा महिला कर्माचाऱ्यांना वाटले नवेकोरे मोबाईल, त्यात निघाले अश्लील व्हिडिओ!

नाशिक आणि मालेगाव मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान धक्कादायकप्रकार पुढे आला आहे. या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्कादायक प्रकार उघडकिस आल्याने एकच खळबळ माजली आहे.

केंद्र सरकारच्या संलग्न असलेल्या एका सजमिक संस्थेकडून या मोबाईल आरोग्य विभागाच्या महिलांना वाटण्यात आले होते.

शासनाकडून वाटण्यात आलेल्या मोटोरोला कंपनीच्या 38 पैकी 6 नव्याकोऱ्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले आहेत.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात IT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान ज्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ आहेत, ते सर्व मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत.

सरकारशीच संबंधित एका सामजिक संस्थेकडून लसीकरण मोहीम संदर्भात आरोग्य विभागाच्या महिलांना लसीकरण मोहिमेसंदर्भात हे मोबाईल वाटण्यात आले होते.

जर नाशिक जिल्ह्यात 38 मोबाईल वाटण्यात आले होते, तर संपूर्ण राज्यभरात किती मोबाईल वाटण्यात आले होते, तसंच किती मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ आढळले आहेत, याची चौकशी करण्याची मागणी आता विरोधक करत आहेत.

मुळात नव्याकोऱ्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ कोणी डाउनलोड केले हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *