Sat. Feb 22nd, 2020

मुंबईत आपत्कालीन घटनांचं सत्र सुरूच, महिनाभरात 137 लोकांचा दुर्घटनांत मृत्यू

मुंबई शहर आणि उपनगरात आपत्कालीन घटनांचं सत्र सुरूच आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत 9,943 आपत्कालीन दुर्घटनांत 137 लोकांचा बळी गेला आहे, तर 579 जण जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना ही माहिती दिली आहे. 1 जानेवारीपासून 2019 जुलैपर्यंत एकूण 9943 आपत्कालीन दुर्घटना घडल्या. यात 137 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 92 पुरुष आणि 45 महिलांचा समावेश आहे. 579 जण जखमी झाले असून त्यात 372 पुरुष आणि 207 महिलांचा समावेश आहे.

दुर्घटना

1 जानेवारी ते जुलै 2019 पर्यंत 9 हजार 943 आपत्कालीन दुर्घटना

दुर्घटनांमध्ये 137 जणांचा बळी तर 579 जखमी

मृतांमध्ये 92 पुरूष आणि 45 महिलांचा समावेश

3032 आगीच्या घटनांमध्ये 17 जणांचा मृत्यू तर 127 जखमी

बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनांची संख्या 622
मृत्यू – 51 जखमी – 227

झाडं कोसळून झालेल्या दुर्घटना – 3364
मृत्यू – 5 जखमी – 27

नाले आणि खाडीत पडल्याच्या 103 घटना
मृत्यू – 39 जखमी – 13

शॉक लागल्याच्या 114 घटना
मृत्यू – 5 जखमी – 13

रस्ते खचून / खराब रस्त्यांमुळे 161 दुर्घटना
मृत्यू -11 जखमी – 53

पूल / पादचारी पूल पडल्याच्या 67 घटना
मृत्यू – 6 जखमी – 34

वायुगळतीच्या 185 घटना
मृत्यू – 2 जखमी – 15

रस्त्यावर ऑईल सांडण्याच्या 615 घटना, एकाचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *