Wed. Oct 5th, 2022

संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राज्यसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना संजय राऊत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वर्ष बंगल्यावर पोहचले होते. त्यांच्या भेटीमागे निमित्त राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीचे असले तरी प्रत्यक्षात राऊतांना स्वतःची उमेदवारी निश्चित करायची आहे हे लपून राहिलेले नाही. बैठक आटोपल्यावर राऊतांनी मुख्यमंत्र्यांसोबत राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. वर्षा निवासस्थानी बैठक झाल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो पक्ष पुढे नेईन. केवळ राज्यसभा निवडणुकीच्या विषयावरच चर्चा झाली असं नाही इतरही विषयांवर चर्चा झाली. काही आमदार सुद्धा उपस्थित होते. मराठा संघटनांचं म्हणणं आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांचंही काही म्हणणं आहे आणि शिवसेनेचाही एक मुद्दा आहे. आमच्या सर्वांचं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की, सहावी जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेल आणि विजयी होईल.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.