गायक राहुल वैद्य अडकणार लग्नबंधनात

बिग बॉसच्या घरात सध्या चर्चेत असलेला गायक राहुल वैद्य लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. राहुल अभिनेत्री दिशा परमारला डेट करत असून बिग बॉसच्या घरात त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दिशाच्या वाढदिवशी राहुलने त्याच्या टीशर्टवर माझ्याशी लग्न करशील का असं लिहून तिला भेट प्रपोज केलं होतं. दिशाने राहुलला होकार दिला. आता यानंतर या जोडीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. यातच राहुलच्या आईन या दोघांच्या लग्नाचा महिना निश्चित झाल्याचं सांगितलं आहे. बिग बॉसच्या घरात राहुल हा नेहमी चर्चेत असतो. शिवाय राहुल आणि दिशा जून महिन्यामध्ये लग्न करणार असल्याचं माहित झालं आहे. मात्र, अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही.
राहुल बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लग्नाची तारीख ठरविण्यात येणार आहे. मात्र, लग्नासाठी जून महिना निश्चित करण्यात आला आहे. “बिग बॉसमधून राहुल बाहेर आला की लग्नाच्या साऱ्या गोष्टी ठरणार आहे. त्या दोघांचं लग्न आहे त्यामुळे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे व्हावं. आम्ही लग्नाच्या लहान-मोठ्या तयारीला लागलो आहोत. दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. ते अत्यंत छान कुटुंब आहे”, असं राहुलच्या आईने गीता वैद्य यांनी सांगितलं आहे. आता लवकरच राहुल हा लग्नबंधनात अडकणार आहे.