Jaimaharashtra news

प्लास्टिक नसून फॉटीफाईड तांदळाचं वितरण

अमरावती:  राज्यासह अमरावती जिल्ह्यात पोषण आहारात तांदळाचं वितरण सुरुय. मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याचं पालकांचं मत आहे. आपण हा तांदूळ बघितला तर, आपल्याला देखील संशय येण स्वाभाविक आहे.याच फरकामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय.तिवसा तालुक्यातील धानोरा गावात प्लास्टिकचा तांदूळ दिला जातोय अश्या अफवा उडाल्यात..त्यामुळे प्रकरणाची चौकशी व्हावी, याकरिता जिल्हा परिषदेचे पथक धानोरा गावात पोहचलय.शालेय पोषण आहाराचे लेखा अधिकारी अमोल इखे यांनी पाहणी देखील केली. हा तांदूळ प्लास्टिक नसून फॉटीफाईड असल्याचं त्यांचं म्हणणं आहे..

अधिकाऱ्यांची पाहणी झाल्यानंतरही हा तांदूळ नकोच अशी भूमिका पालकांची आहे.तांदळाऐवजी शासनाने दुसरं काहीतरी द्यावं अशी पालकांची मागणी आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणात तांदळातून लोह मिळाव याकरिता शासनाने फोरटीफाईड तांदूळ विद्यार्थ्यांकरिता सुरू केलाय.मात्र पालकांची या तांदळाला नापसंती दिसते आहे.

Exit mobile version