India

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे संघर्ष

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले असून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी नव्याने केदार दिघे यांना सोपवण्यात आली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असून आता ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुनावलं आहे.

बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी आनंद दिघे यांच्यासोबत जे काही घडले त्याचा साक्षीदार मी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावेळी केदार दिघेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. केदार दिघे म्हणाले होते की, आनंद दिघेंबाबत जे घडलं ते माहित होतं तर मग इतके वर्ष गप्प का होता? असा सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?” असं केदार दिघेंनी म्हटलं होते.

manish tare

View Comments

  • I savour, result in I found just what I used to be looking for. You've ended my 4 day lengthy hunt! God Bless you man. Have a nice day. Bye

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

5 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

6 days ago