कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यानंतर पालघर जिल्हाबंदीचे आदेश

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू बाधित संख्येमध्ये वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिलेत. यास रस्त्यावर दुचाकी, चारचाकी तसेच सायकल, इतकंच नाही तर लोकांना सुद्धा रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली जात आहेत, तरीसुद्धा लोक मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी आणि चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. पालघर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विजयकांत सागर स्वतः जातीने लोकांना वारंवार आवाहन करताना दिसत आहेत.
पोलिसांची गाडी जप्तीची कारवाई
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतोय. वारंवार लोकांना आव्हान करूनही लोक रस्त्यावर दुचाकी-चारचाकी घेऊन सर्रास हिंडताना दिसतायेत. सर्वप्रकारच्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीये. घराबाहेर पडायचं नाही, असे सांगूनही मोठ्या प्रमाणामध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे.
पोलिसांनी वसईत दिवसभरामध्ये शेकडो गाड्या जप्त केल्या. इतकं करूनही जनता थातूरमातूर कारणं सांगून पोलिसांना गाडी सोडण्यासाठी विनंती करत आहेत.