Mon. Aug 15th, 2022

नागपुरात जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचं आयोजन

जिल्हास्तरीय महिला मेळावा आणि विभागस्तरीय सरस विक्री प्रदर्शनाचे नागपूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. नागपूरात जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, महिला आणि बाल कल्याण आणि आरोग्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच महिलांना स्वयं रोजगार, नव उद्योजकता तसेच बाजाराशी सुसंगत स्पर्धात्मक दृष्टीने सक्षम करण्याच्या हेतूने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ५ जूनपर्यंत चालणाऱ्या या विभागीय सरस प्रदर्शनात महिला बचत गटाचे १५० स्टॉल्स असून तब्बल नागपूर जिल्ह्यातील सर्व तेराही तालुक्यातील महिला बचत गटातील १० हजार पेक्षा जास्त महिलांनी आपला सहभाग नोंदविला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सरस प्रदर्शनीत नागपूर विभागातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूंची खरेदी नागपूरकरांना करायला मिळणार आहे. त्याचवेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांना मार्गदर्शक ठरणारी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध जीवनावश्यक वस्तू, खाद्य पदार्थांची स्टॉल्स, मार्गदर्शन कार्यशाळा यांच्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.