दिवा रेल्वे स्थानकात रूळावर लोखंडी रूळ प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात
जय महाराष्ट्र न्यूज, दिवा
दिवा रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या रुळ घातपात प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले पाचही जण व्यसनी असून, घटनेच्या अडीच महिन्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात यश आलं.
याबाबत अद्याप जीआरपी पोलिसांना कोणतंही यश मिळू शकलेलं नव्हतं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहे. जानेवारी महिन्यात दिव्यात मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला होता. गाडीच्या लोको पायलटने ट्रॅकवर 15 फुटी जुना रुळ ठेवल्याचं पाहिलं आणि तात्काळ गाडी थांबवली.