Thu. Jan 20th, 2022

हायवे दारूबंदीवरून दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग महापालिका किंवा MMRDA ला हस्तांतरित करण्यावरुन परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. या निर्णयाविरोधात रावते यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यातून न्यायालयाच्या अवमान याचिकेला सामोरे जावे लागेल असंही मुख्यमंत्र्यांना सुचित केलं आहे. 

 

सुप्रीम कोर्टाने हायवेपासून 500 मीटर अंतरावर मद्यपान विक्री परवाने बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मिळणाऱ्या महसूलावर पाणी सोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित केले. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही या महामार्गावरील बंद झालेले दारुची दुकानं पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *