शिवसैनिक म्हणून आलो असतो तर कर्नाटकात घुसलो असतो – दिवाकर रावते
जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव
महाराष्ट्रातील शिवसेना मंत्र्यांना बेळगाव प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. जय महाराष्ट्र घोषणेवरील बंदीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती मोर्चा काढणार आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे मंत्री या मोर्चात सहभागी होणार आहेत. मात्र, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंना प्रवेशबंदी केली.
तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीनंही रावतेंना विरोध केला. तरीही रावते बेळगावात गेले, त्यावेळी त्यांना कोगणोलीत कर्नाटक पोलिसांनी अडवलं आणि नोटीस दिली.
त्यानंतर रावते पुन्हा महाराष्ट्रात परतले. मंत्री म्हणून पोलिसांच्या नोटिशीचा आदर केला, शिवसैनिक म्हणून आलो असतो तर कर्नाटकात घुसलो असतो असं रावतेंनी
म्हटले.