शिवकालीन मोडी भाषेतून दिवाळीची Greeting cards!

दिवाळीनिमित्त मोडी लिपीतील भेटकार्डांच्या स्पर्धेचं आयोजन सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात करण्यात आलं होतं. महाविद्यालयाच्या (College) इतिहास विभाग आणि मोडीलिपी वर्गामार्फत मोडी लिपीतील भेटकार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.
मोडीलिपीतून शुभेच्छा देण्याचा हा राज्यातील एकमेव उपक्रम असून, गेली चार वर्षे तो सलगपणे राबविला जातोय. सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील मुलींनी दिवाळीचे हे शुभेच्छा संदेश मोडी लिपीतून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
काय आहे या उपक्रमाचं वैशिष्ट्य?
राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
मोडी लिपीत संदेश लिहिलेल्या आकर्षक भेटकार्डांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गरवारे कन्या महाविद्यालयात मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महाविद्यालयामार्फत दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येतं.
यामध्ये मोडी लिपी दिन, मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, मोडीमधील भित्तीपत्रिका असे कार्यक्रम होतात.
गेल्या चार वर्षांपासून मोडी लिपीतील शुभेच्छा संदेश देणाऱ्या भेट कार्ड स्पर्धांचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
यंदा मुलींनी यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आहे.
नानाविध प्रकारचे साहित्य वापरून आकर्षक सजावट केलेली, मोडी शुभेच्छा संदेश असणारी भेटकार्डं (Greetings) तयार करण्यात आली आहेत.
मोडी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या कल्पनेतून हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षे सुरू आहे. यामुळे इतिहास कालीन नाश पावत चाललेली मोडी लिपी आजच्या युगातही टिकून आहे