दिपावली लक्ष्मीपुजन निमीत्त श्री.विठ्ठल आणि श्री.रूक्मिणीमातेचा गाभारा सजला लाल
आज दीपावलीचा उत्साहा संपूर्ण देशभर पाहायला मिळतोय

आज दीपावलीचा उत्सव हा संपूर्ण देशभर पाहायला मिळतोय. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिपावली लक्ष्मीपुजन निमीत्त श्री.विठ्ठल आणि श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात लाल-पिवळ्या जरबेरा फुलाची सुंदर, मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.
देवाचा गाभारा ,सोळखांभी मंडप ,चौखांभी मंडप,आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. त्याचबरोबर संत नामदेव पायरी येथील महादरवाजा, म्हणजेच पितळी दरवाजा उघडण्यात आला आहे. देवाचे दर्शन जरी बंद असले तरी या नामदेव पायरी जवळ भाविक दर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत आहेत.