Abhyang Snan: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे अभ्यंगस्नानाचा शुभ दिवस. या दिवशी केवळ स्नान नव्हे, तर आत्मशुद्धी, सकारात्मकता आणि नवऊर्जेचा अनुभव घेतला जातो. पूर्वी मुघल काळात राण्या व सरदारानी वापरलेले 'शाही उटण' हेच आज घरच्या घरी पुन्हा बनवण्याची परंपरा जपली जात आहे. हे उटण त्वचेला नैसर्गिक पोषण देते, केमिकलपासून मुक्त ठेवते आणि त्वचेला आतून तजेलदार बनवते.
अभ्यंगस्नानाची सुरुवात सूर्योदयापूर्वी केली जाते. या वेळी शरीरावर तेल लावून त्यानंतर उटण लावले जाते. असे केल्याने शरीरातील रक्तसंचलन सुधारते, त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि शरीराला नवचैतन्य मिळते. आजच्या धावपळीच्या आयुष्यातही हा पारंपारिक उपाय त्वचेला रिलॅक्सेशन देण्यासाठी उत्तम मानला जातो.
घरगुती कृती
शाही उटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य साधे असले तरी त्याचे फायदे मोठे आहेत.
एका वाडग्यात सर्व कोरडी सामग्री एकत्र करून नीट मिसळा. त्यात हळूहळू गुलाबजल आणि दूध घालून घट्ट पण लवचिक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान, हात, पाय आणि शरीरावर हलक्या हाताने लावा. १०-१५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
फायदे
उटण हे केवळ सौंदर्यप्रसाधन नाही, तर एक नैसर्गिक औषधीय उपचार आहे. बेसन त्वचेवरील तेलकटपणा कमी करतो, तर हळद अँटिबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुम आणि डाग दूर करते. बदाम पूड त्वचेला व्हिटॅमिन ई पुरवते आणि गुलाबजल नैसर्गिक टोनरचे काम करते. यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहते.
उटण लावल्यावर त्वचेवर एक हलका नैसर्गिक सुगंध राहतो, जो मन प्रसन्न ठेवतो. नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळतो, डेड सेल्स निघून जातात आणि त्वचेला नवजीवन मिळते.
त्वचेच्या प्रकारानुसार काही टिप्स
-
संवेदनशील त्वचेसाठी: फक्त बेसन, दूध आणि गुलाबजल वापरा.
-
कोरड्या त्वचेसाठी: थोडे नारळ तेल किंवा बदाम तेल घालावे.
-
हिवाळ्यात : उटण गरम दूधाने तयार केल्यास त्वचा अधिक हायड्रेटेड राहते.
सकारात्मक ऊर्जेचा अनुभव
दिवाळीच्या अभ्यंगस्नानात या शाही उटणाचा वापर केल्याने फक्त शरीरच नाही, तर मनही ताजेतवाने होते. यामधील नैसर्गिक घटक शरीराला थकवा आणि ताणतणावापासून आराम देतात. दिवसभर आत्मविश्वास, आनंद आणि उत्साह टिकून राहतो.
आधुनिक काळात बाजारातील केमिकलयुक्त बॉडी स्क्रब आणि फेस पॅक उपलब्ध असले, तरी घरगुती शाही उटणाची पारंपारिक पद्धत ही आजही सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक आहे. दिवाळीच्या शुभ दिवशी हे उटण लावून अभ्यंगस्नान केल्यास शरीर, मन आणि आत्मा तिन्ही स्तरांवर शुद्धतेचा अनुभव मिळतो.