Mon. Dec 6th, 2021

ज्ञानदेव वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. याप्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती वानखेडे यांनी केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना तसा आदेश देण्यास नकार दिला आहे. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनाही न्यायलयाने खडेबोल सुनावले आहे. मलिकांनी यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

ज्ञानदेव वानखेडेंचा दावा

  मलिक दररोज नवा आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या जात असून आम्हाला अनेक धमक्याही येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्हाला त्रास होत आहे. असे ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *