Mon. May 23rd, 2022

ज्ञानदेव वानखेडेंनी सादर केले समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्र

  क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या रडारवर आहे. आर्यनच्या जामिनावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत. त्याबाबत समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्र सादर करत हिंदू असल्याचा पुरावा सादर केला आहे. तसेच नवाब मलिकांना न्यायालयात खेचणार असल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले आहे.

 समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, ‘नवाब मलिक ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. त्यामुळे सततच्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या विरोधात आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले आहे.

 पत्रकार परिषदेमध्ये ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू असल्याचे पुरावेसुद्धा सादर केले. समीर वानखेडे यांच्या लग्नाच्या वेळी दोन्ही कुटुंबीय मुस्लिम असल्याचा दावा समीर वानखेडे यांचे लग्न लावणाऱ्या काझींनी केला. मात्र, हा दावा समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी फेटाळून लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.