इंदोरीकर महाराजांवर राज्य शासन गुन्हा दाखल करणार नाही – बच्चू कडू

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलंच वातावरण तापलं आहे. इंदोरीकरांनी आपल्या एका भाषणादरम्यान पुत्रप्राप्तीचा सम-विषम फार्म्युला सांगितला.
यानंतर इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. इंदोरीकर महाराजांच्या मागे आता राज्यमंत्री बच्चु कडू उभे राहिले आहेत.
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करणार नसल्याचं बच्चु कडू यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले बच्चू कडू ?
इंदोरीकर महाराजांवर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार नाही. दोन तासाच्या भाषणामध्ये एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो .तो माझ्या किंवा इंदुरीकर महाराज यांच्याकडून ही जाऊ शकतो.
आपल्या देशात चुकीचा शब्द पकडण्याची सवय लागली आहे. ती सवय बदलली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
तसेच इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस दिली आहे. त्या नोटीसची चौकशी होईल, असेही बच्चू कडू यांनी आवर्जून सांगितले.
अधिक वाचा : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा –अंनिस
दरम्यान इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे करण्यात आली आहे.
यासाठी अहमदनगरमध्ये अड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज लिहून मागणी केली आहे.