Mon. Dec 6th, 2021

“ED कार्यालय परिसरात गर्दी करु नये, पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

“ईडी कार्यालय परिसरात गर्दी करु नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता राखावी”, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ED मार्फत राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात त्यांचा सहभाग नसतानाही राजकिय सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीकडून आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याचं पार्श्वभूमीवर ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर सकाळपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिल्ह्यात फिरून दुकाने बंद करण्याचा आवाहन करत आहेत. परभणीसह पाथरी, गंगाखेड,सेलू आणि मानवत या ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शरद पवारांवर सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

यामुळे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून तसेच ट्विट करत कार्यकर्त्यांना उद्या शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “ईडी कार्यालय परिसरात गर्दी करु नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता राखावी”, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मी कधीही कोणत्याच बँकेच्या संचालक मंडळावर नसताना त्यांना माझी चौकशी करण्याचे करायची आहे तर ते करुदेत असे ते म्हणाले आहेत. मी स्वतःहून त्यांच्याकडे जातो. कारण आचारसंहिता असल्याकारणाने मला राज्यव्यापी दौऱ्यावर जायचे आहे.”असं त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *