Sat. Jul 4th, 2020

मंत्रिमंडळातील बातम्या फोडू नका; मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना तंबी

मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना सूचना केल्या आहेत. आपण जी चर्चा करतो, ती माहिती बाहेर उघड होत आहे. यामुळे सरकारची बदनामी होऊन, वाद प्रसंग निर्माण होत आहेत. यामुळे आपल्यात होणाऱ्या चर्चेबद्दल बाहेर काही सांगू नको, अशी सूचना मंत्र्यांना केली आहे.

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

या प्रकारामुळे थोड्या वेळ अधिकारी वर्गातही गोंधळ निर्माण झाला. अधिकारी दालनाबाहेर जाताचा मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची शाळा घेतली.  

आपण मंत्रिमंडळ आणि इतर बैठकांमध्ये चर्चा करतो. मंत्री ती चर्चा बाहेर सांगतात. त्यामुळे बैठक गुप्त राहत नाही. त्यामुळे विनाकारण सरकारला बदनामी सहन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बैठकीत जे काही होतं, ते बाहेर न सांगण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना दिला.

याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळासोबत तासभर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *