Thu. Jun 17th, 2021

‘थलैवा’ रजनीकांतच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

शाळेत असतांना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. १९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरता गेले. मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली

young.jpg
रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरूत झाला. त्याचं खरं नाव आहे शिवाजीराव गायकवाड. सिनेमात घेतलेलं टोपणनाव ‘रजनीकांत’. आई वारल्यानंतर चार भावंडांतल्या सर्वात लहान रजनीकांतला पैसे कमावण्यासाठी हमालाचं काम करावं लागलं. मोठा झाल्यावर त्याला बस कंडक्टरची नोकरी मिळाली.

the-stylish-yank.jpg

बस कंडक्टर असला तरी रजनीकांतला सिनेमाचा शौक होता. अभिनयाची आवड होती. मुंबईमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करतानाही रजनीकांत हा आपल्या खास स्टाईलमध्ये पैसे हवेत उडवून खिशात टाकत असे. या स्टाइलवर प्रवासीही खुश होत. एक दिवस ही स्टाईल बसने प्रवास करणाऱ्या एका तामिळ निर्मात्याने पाहिली आणि त्याने रजनीकांतला मद्रासला बोलावून घेतलं. 

style1.jpg

 

रजनीकांत आज जरी तामिळ जनतेचा ‘थलैवा’ असला, तरी रजनीकांतला तामिळ अजिबात येत नव्हतं. त्याला तामिळ भाषा आत्मसात करावी लागली. तसंच अभिनयाचंही प्रशिक्षण घ्यावं लागलं. त्यानुसार १९७३ मध्ये त्याने ‘मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट’मधून डिप्लोमा केला.

एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान रजनीची भेट सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्याशी झाली. त्याने त्याला तामिळ सिनेमाची ऑफर दिली. १९७५ साली या ‘अपूर्वा रागंगाल’ सिनेमातून रजनीकांतने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या सिनेमात कमल हासन मुख्य भूमिकेत होता. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

movie1.jpg
सुरुवातीला रजनीकांतने व्हिलनच्या भूमिका केल्या. नंतर सकारात्मक भूमिका केल्या. ८० च्या दशकात रजनीकांतने ‘अंधा कानून’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र अनेक चित्रपट करूनही रजनीकांत हिंदी सिनेमांत चालला नाही. पण रजनीकांत हा सुपरस्टारच एवढ्या ताकदीचा होता, की त्याने तामिळ सिनेमालाच हिंदी सिनेमांपेक्षा वरच्या उंचीवर नेलं आणि अखेर बॉलिवूडला त्याची दखल घ्यावी लागली.

style_4.jpg

‘मुत्थू महाराजा’ या सिनेमातून रजनीकांत जपानमध्येही प्रसिद्ध झाला. तेथेही रजनीकांतची स्टाईल लोकांना प्रचंड आवडली. रजनीकांतचं हवेत सिगरेट उडवून तोंडात पकडणं, गॉगल घालण्याची स्टाईल यावर लोक फिदा आहेत. आजही ती स्टाईल पाहाण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करतात. एवढंच नव्हे, तर रजनीकांतचं चालणंसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्यांचा विषय असतो. रजनीची ‘मास एण्ट्री’ आणि त्यात त्याचं खास स्टाईलमध्ये चालणं दक्षिण भारतात लोक मोठ्या प्रमाणावर कॉपी करतात.

style.jpg

एक काळ असाही होता जेव्हा रजनीकांत सिनेमाच्या ग्लॅमरने त्रस्त होता. त्याने सिनेक्षेत्र सोडण्याचा निर्णय जवळजवळ पक्का केला होता. पण के. बालचंदर, कमल हासन यासारख्या जवळच्या मित्रांनी त्याला रोखलं.

rajni12.jpg

आपल्या दुसऱ्या इनिंगमध्येही रजनीकांतचे ‘शिवाजी : द बॉस’, ‘रोबोट’, ‘कबाली’, ‘काला’ हे सिनेमे सुपरडुपर हिट झाले. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या ‘2.0’ लाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय.

2.0.jpg

रजनीकांतला दक्षिण भारतात त्याच्या फॅन्सनी देवाचाच दर्जा दिलाय. त्याच्या सिनेमांना जाताना अनेक प्रेक्षक थिएटरबाहेर मंदिराबाहेर काढाव्यात, तशा चप्पला काढून ठेवतात. स्क्रीनवर रजनीकांत दिसला की नाचायला लागलतात. ‘2.0’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मुंबईतील एका थिएटरमध्ये रजनीकांतच्या एण्ट्रीनंतर लोक बेभान होऊन नाचू लागले. त्यामुळे पुढील 3 मिनिटं शो थांबवावा लागला. दक्षिण भारतात तर रजनीकांतच्या शेकडो फूट उंचीची होर्डिंग्ज उभारून लोक त्यावर दुधाचा अभिषेकही करतात. 

frenzy.jpg

सुपरस्टार असूनही त्याचं साध राहणं अनेकांना आवडतं. तो प्रत्यक्ष जीवनात कधी मेक-अप करत नाहीत किंवा विग लावून आपलं टक्कलही लपवत नाहीत. त्याची हिच साधी राहणी त्यांना इतर कलाकारांपेक्षा खूपच वेगळी ठरवते.

simplicity.jpg

रजनीकांतने तामिळ सिनेमांसह हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. २००० साली त्याला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

दक्षिणेतला सुपस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही हे नक्की. त्यांचा ६८ वा वाढदिवस त्यांचे चाहते मोठ्या आनंदात साजरा करत आहेत आणि यानिमित्तानं चाहत्यांना आणि रजनीकांत यांनादेखील एक वेगळी भेट ‘पेट्टा’च्या दिग्दर्शकांनी दिली आहे. वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षीत अशा ‘पेट्टा’ चित्रपटाचा पहिला वहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सबकुछ रजनीकांत असलेल्या या टीझरमध्ये केवळ रजनीकांत यांच्या प्रसिद्ध स्टाइल दाखवण्यात आल्या आहेत.

ओणमच्या मुहूर्तावर २०१९ मध्ये ‘पेट्टा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि चाहतेही हा चित्रपट पाहण्यास खूपच उत्सुक आहेत. कार्तिक शुभराजा यांनी ‘पेट्टा’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्धिकी कॉलिवूडमध्ये काम करणार आहे. या बिग बजेट अॅक्शनपटात रजनीकांत हे पुन्हा एकदा वेगळ्या रुपात दिसणार आहेत. दार्जिंलिंग, लखनौ, चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी ‘पेट्टा’चं चित्रिकरण करण्यात आलं आहे.

petta.jpg

रजनीकांत यांचे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंगसाईटवरदेखील मोठे फॉलोअर्स आहेत. २०१३ मध्ये रजनीकांत ट्विटरवर आले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसणाऱ्या रजनीकांत यांचे ५१ लाखांहून अधिक फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. राजकारणात आल्यावर मात्र रजनीकांत बऱ्यापैकी सक्रिय झाले. मात्र इतर कलाकारांच्या तुलनेत ट्विटवर सक्रिय असण्याचं त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. ट्विटरवर ते फक्त २४ जणांना फॉलो करतात. यात महानायक अमिताभ बच्चन या केवळ एकाच बॉलिवूड कलाकाराचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मुलगी सौंदर्या, ऐश्वर्या, जावई धनुष, संगीतकार ए.आर. रेहमान, संगीतकार अनिरुद्ध रवीचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फॉलो करतात. या यादीत काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश आहे.

rajini_twi.png

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘गिरफ्तार’, ‘अंधा कानून’, ‘हम’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. सुरूवातीच्या काळात रजनीकांतचे बरेचसे सिनेमे हे अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांचे तामिळ रिमेक होते. रजनीकांत यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही मला नेहमीच प्रेरणा देतात’ असं लिहित रजनीकांत यांनीदेखील शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.

amitabh_rajni.jpg
राजकारण
३१ डिसेंबर २०१७ रोजी चेन्नैमधील श्रीराघवेन्द्र मण्डपम् ह्या ठिकाणी रजनीकांत ह्यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे, तसेच २०१८ मध्ये आपण रीतसर पक्षस्थापना करणार असून संपूर्ण तमिऴनाडू राज्यातील येत्या निवडणूका लढविणार असल्याचे अधिकृतरित्या घोषित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *