Sat. Nov 23rd, 2019

मार खाऊन खाऊन ‘या’ विनोदवीराने कमावले 320 कोटी!

हल्ली साऊथ इंडियन सिनेमे बघण्याची क्रेझ वाढत चालली आहे. तेलुगू, तामिळ भाषेतले चित्रपट हिंदीमध्ये डब करून टीव्हीवर दाखवले जातात. तसंच यूट्यूबवरही मोठ्या प्रमाणावर हे सिनेमे पाहिले जातात. तुम्ही तेलुगू मुव्ही पाहात असाल, तर त्यात एक कलाकार हमखास दिसतोच दिसतो… तो म्हणजे विनोदवीर ब्रह्मानंदम!

brahmanandam_expressions_See_and_Enjoy_Telugu_Funny_Images_14.JPG

उंचीने कमी, थोडासा स्थूल, डोक्यावर विरळ झालेले केस आणि घारे डोळे… अशा रूपातील ब्रह्मानंदम सिनेमात हिरोच्या बोरबरीने भाव खाऊन जातो. सिनेमात त्याच्या एण्ट्रीची प्रेक्षक वाट पाहात असतात. बहुतेक सिनेमांत पडद्यावर हिरो, हिरोइन, व्हिलन किंवा त्याची सहकलाकार त्याला सतत मारतच असतात आणि पब्लिक मात्र हसून हसून बेजार होत असतं. ब्रह्मानंदमची लोकप्रियता एवढी शिगेला पोहचली आहे, की आज प्रत्येक तेलुगू सिनेमात तो असतोच असतो.

brahmanandam_expressions_See_and_Enjoy_Telugu_Funny_Images_45.jpg

ब्रह्मानंदमबद्दलच्या काही गमतीदार गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

ब्रह्मानंदम यांचा जन्म आंध्र प्रदेशातल्या साटेनापल्ली जिल्ह्यातल्या मुपल्ला गावी झाला.

लहानपणी ब्रह्मानंदम यांची परिस्थिती हालाखीची होती. मात्र त्यातूनही शिक्षण घेऊन ब्रह्मानंदम एम.ए. झाले.

अत्तिल्ली कॉलेजात ते तेलुगू भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते.

brahmanandam_expressions_See_and_Enjoy_Telugu_Funny_Images_18.JPG

आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत त्यांनी काम केलं होतं. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल.

त्यानंतर ब्रह्मानंदम वारंवार नाटकात काम करू लागले. यातूनच पुढे त्यांना तेलुगू सिनेमात लहान भूमिका मिळू लागल्या.

मात्र त्यानंतर ब्रह्मानंदम यांची लोकप्रियता तुफान वाढली.

सर्वाधिक सिनेमांमध्ये काम केल्याबद्दल ब्रह्मानंदम यांचं नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आलं आहे.

ब्रह्मानंदम यांनी आत्तापर्यंत 1,000 पेक्षा जास्त सिनेमांत काम केलंय. एका कलाकाराने एवढ्या प्रचंड प्रमाणात सिनेमांमध्ये काम केल्याचं उदाहरण दुसरं नाही.

2007 सालीच 700 सिनेमांत काम केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.

61 वर्षांच्या ब्रह्मानंदमने 33 वर्षांच्या करिअरमध्ये लोकांना खळखळवून हसवलंय.

ब्रह्मानंदम हे आपल्या कामाचे पैसेही थोड थोडके नव्हे, तर कोटींच्या घरात घेतात. भूमिका छोटी असो वा मोठी, ते कमीत कमी 1 कोटी रुपये मानधन घेतात.

brahmanandam_expressions_See_and_Enjoy_Telugu_Funny_Images_14.JPG

ब्रह्मानंदम आता 3 दशकांच्या करीअरमधून 350 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक बनले आहे.

ब्रह्मानंदम यांच्याकडे Audi R8, Audi Q7 तसंच मर्सिडिज बेंझ, इनोव्हा सारख्या महागड्या गाड्या आहेत.

आपल्या सिनेमातील कमाईतून त्यांनी 5 कोटी रुपये किमतीची शेतजमीन विकत घेतली आहे.

2009 साली त्यांना आपल्या कामाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

आपला जन्म लोकांना हसवण्यासाठीच झाला आहे, यावर ब्रह्मानंदम यांना पूर्ण विश्वास आहे.

आपलं नाव ‘ब्रह्मानंदम’ याचा अर्थ ‘ब्रह्मांडाला आनंद देणारा’ असा असल्याचं ते सांगतात.

brahmanandam_expressions_See_and_Enjoy_Telugu_Funny_Images_4.jpg

34 वर्षं काम करूनही लोक अजून आपल्या विनोदांना कंटाळले नाहीत, याबद्दल ब्रह्मानंदम लोकांचे आभार व्यक्त करतात. आजही अनेक साऊथ इंडियन सिनेमांचे फॅन्स ब्रह्मानंदम यांच्या एण्ट्रीची आवर्जून वाट पाहात असतात. त्यांची एण्ट्रीही हटके स्टाईलने होते. कधी त्यांचं केवळ टक्कल पाहूनच थिएटरमध्ये शिट्ट्या वाजू लागतात. ते पडद्यावर मार खातात आणि लोकांना व्हिलनला मार खाताना बघण्यापेक्षाही जास्त मजा वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *