Tue. Aug 20th, 2019

राजकारण करा पण शहिदांचा अपमान नको – राज्यवर्धनसिंह राठोड   

146Shares

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे.

‘राहुल गांधींना भारतीय लष्कराबद्दल काहीच माहीत नाही, दिल्लीत बसून फक्त पत्रकार परिषदांचा खेळ करता.

यातून तुम्ही लष्कराचा आणि शहीद जवानांचा अपमान केला आहे’, असा आरोप राठोड यांनी व्हिडिओतून केला आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. ‘राफेल विमान खरेदीत 30 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे.

या पैशातून विमान कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील जवानांच्या कुटुंबांना मदत करता येऊ शकते’, असे राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले होते.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राठोड यांनी आक्षेप घेतला आहे.

‘ज्याला भारतीय संस्कृतीची जाण आहे ती व्यक्ती जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करते’, असे राज्यवर्धनसिंह राठोड यांनी म्हटले आहे.

‘भारताचे जवान पैशांसाठी लढत नाही. मर्सिनरी आणि जवानांमध्ये अंतर आहे. मर्सिनरी हे पैशांसाठी कुठल्याही देशाविरोधात लढतात.

मात्र आपले जवान हे फक्त देशासाठी लढतात. तेही पैशांसाठी नाही तर आत्मसन्मान, देशाची सुरक्षा आणि देशाच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावतात’, असं राठोड यांनी म्हटलं आहे.

146Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *