Thu. Jun 20th, 2019

म्हणून डॉक्टरने चक्क गाडी सारवली शेणाने!

0Shares

आत्तापर्यंत घराचं आंगण शेणाने सारवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण थेट महागडी गाडी कुणी शेणाने सारवलेली तुम्ही पाहिली आहे का? पण म्हणतात ना, पुण्यात काय अशक्य आहे? पुण्यातीलच डॉ. नवनाथ दुधाळ यांनी चक्क आपल्या महिंद्रा XUV 500 ला शेण फासलं आहे.  त्यांनी कार शेणाने सारवण्याचं कारण वेगळं आहे.

का फासलं गाडीला शेण?

पुण्यामध्ये वाढत्या तापमानामुळे सर्वच नागरीक हैराण झाले आहेत.

मुंबईच्या टाटा कॅंसर हॉस्पिटलमध्ये काम करणारे वरिष्ठ डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी मात्र वेगळीच शक्कल लढवली आहे.

त्यांनी पुण्यामध्ये आपल्या महिंद्रा XUV 500 ला त्यांनी शेणाने सारवले आहे.

गाडीच्या काचा आणि हेडलाईट या व्यतिरिक्त संपुर्ण गाडी त्यांनी शेणाने सारवली आहे.

गाडीवर तीन थरांमध्ये शेण सारवण्यात आलंय. हे आवरण एक महिन्यापर्यंत टिकू शकते.

हे शेण एका महिन्यानंतर पाणी आणि सुती कापडाने सहज साफ करता येते.

या शेणामुळे गाडीला कोणतंही नुकसान होत नाही.

गाडीला शेणाचे डागही पडत नाहीत किंवा रंगही खराब होत नाही.

गाडीला शेणाचा वास येत राहतो. मात्र तोही काही वेळात उडून जातो.

मात्र याचे फायदेही खूप आहेत.

बाहेरील तापमानाच्या तुलनेत कारमधील तापमान 5 ते 7 अंशांनी कमी होतं.

शेणाने सारवलेल्या गाडीवर बाहेरच्या तापमानाचा काहीच परिणाम होत नाही.

ही पर्यावरणासाठी देखील चांगली बाब आहे.

गाडीचं तापमान कमी राहत असल्यामुळे गाडीमध्ये AC लावायचीही गरज पडत नाही.

गोमुत्र आणि गायीच्या शेणामुळे कँसरसारख्या दुर्धर आजारावर होणाऱ्या फायद्याचा दुधाळ यांनी अभ्यास केलाय. त्यामुळे गाडी शेणाने सारवल्याचा शरीरावरही चांगला परिणाम होतो.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: