Tue. Oct 26th, 2021

कोविड साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन प्रथमच डाॅक्टरला अटक

सांगली  मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव यांस सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात पोलिसानी आज अटक केली. कोविड साथीदरम्यान सदोष उपचाराच्या आरोपावरुन जिल्ह्यात प्रथमच डाॅक्टरला अटक झाली आहे. मिरजेतील अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयात पुरेशी यंत्रसामुग्री नसतानाही दोन महिन्यात २०५ रुग्ण दाखल करुन घेण्यात आले होते. यापैकी ८९ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

रुग्णालयातील उपचाराबाबत व बिल आकारणीबाबत तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. महेश जाधव याने नवीन रुग्ण दाखल करुन घेतल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले.याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिल आंबोळे यांनी डॉ. महेश जाधव याच्याविरुद्ध गांधी चाैक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. जाधव याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.
याप्रकरणी पोलिसांनी चाैकशी करुन डॉ. जाधव यास मदत करणार्‍या इतर सात जणांवरही गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली . तर दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणार्‍या 205 रुग्णांपैकी तब्बल 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने उपचारात हलगर्जीपणा व रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याबद्दल डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू केले होते. उपचारासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथकाऐवज होमिओपॅथीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. उपचारासाठी भरमसाठ बिले आकारणी करून बिले देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *