धक्कादायक! डॉक्टरानेच केली रुग्णाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

जयपूरच्या सवाई मानसिंह मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरने चक्क रुग्णालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुबारिक असे रुग्णाचे नाव असून विषारी औषध पिल्यामुळे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रक्ताचे नमुने घेण्यासाठी महिला डॉक्टर गेल्यावर रुग्ण हिंसक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
जयपूरच्या मानसिंह मेडिकल कॉंलेजमध्ये डॉक्टराचा एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये डॉक्टर एका रुग्णाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
मुबारिक असे या रुग्णाचा नाव आहे.
मुबारिकने विषारी औषध पिल्यामुळे आणि पोटाच्या विकारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र एका महिला डॉक्टरने त्याच्या रक्ताचे नमूने घेण्यासाठी गेले असताना तो हिंसक झाला.
तसेच मुबारिकने डॉक्टरांना मारहाणही केली.
इतर डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी मिळून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनाही मारहाण केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे एका डॉक्टराने मुबारिकला मारहाण केल्याचे समजते आहे.
मात्र त्या डॉक्टरने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बदल केले असल्याचे म्हटलं आहे.
तसेच मुबारिक ठणठणीत असल्यामुळे त्याला लवकरच डिसचार्ज देणार असल्याचे म्हटलं आहे.