Sun. Sep 19th, 2021

जेव्हा मृत्यू पावलेला रुग्ण आपल्या पोस्ट मॉर्टमपूर्वी उठून रडू लागला… 

Labeled remains of person lying in mortuary

डॉक्टर म्हणजे रुग्णाला मृत्यूच्या दारातून वाचवणारे देवदूत, असं मानलं जातं. मात्र मध्य प्रदेशात मात्र एका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णावर आणि त्याच्या परिवारावर भलताच प्रसंग ओढावला. येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रात्री मृत घोषित केलेली व्यक्ती सकाळी चक्क जिवंत झाला.

कसा झाला मृत माणूस जिवंत ?  

72 वर्षीय किशन काशीराम मध्य प्रदेशातील हॉस्पिटलमध्ये एकटेच दाखल झाले होते.

उपचारांदरम्यानच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रुग्ण निधन पावल्याची खातरजमा केली.

त्यानंतर रात्री 9 वाजता रुग्ण दगावल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी किशन काशीराम यांच्या शवाचं postmortem करण्यात येणार होतं.

त्यासाठी पोलीसही शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन सुरू करण्यापूर्वी चमत्कार घडला.

मृत घोषित केलेल्या किशन काशीनाथ यांचा श्वासोच्छवास सुरू असल्याची शंका पोलिसांना आली.

त्यांनी डॉक्टरांकडे यासंदर्भात चौकशी केली.

पोलिसांची शंका खरी ठरली.

मृत किशन काशीनाथ शवविच्छेदनापूर्वी चक्क जागे झाले आणि रडू लागले.

अचानक घडलेल्या प्रकाराने डॉक्टरांची तारांबळ उडाली.

आपण ज्याला मृत घोषित केलं, तो रूग्ण चक्क जिवंत आहे हे समजल्यावर त्याच्यावर पुढील उपचार करण्यास सुरूवात केली गेली.

डॉक्टरांनी तातडीने सलाईन लावून किशन काशीराम यांच्यावर उपचार सुरू केले.

मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

अजूनही त्यांच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती मिळालेली नाही.

‘आम्ही चुकलो’, डॉक्टरांची कबुली

या प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे.

आपल्याच निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचं डॉक्टरांनीही मान्य केलं.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस रोशन यांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट केलंय.

डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध रुग्णाला मात्र नाहक प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *