Sat. Jul 31st, 2021

डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा नायर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला  होता. वरीष्ठांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून एका डॉक्टर युवतीने आत्महत्या करून जीवन संपवल आहे. आदिवासी कोट्यातून डॉक्टर पदवी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पायल ताडवीला वरीष्ठाकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जीवन संपवावे लागल आहे. नायर रुग्णालयातल्या तीन वरिष्ठ डॉक्टर महिलांविरुद्ध याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल तडवीवर तिच्या जातीवरून कमेंट केल्यामुळे या प्रकरणात अट्रोसिटी कायदा सुद्धा लागू करण्यात आला आहे. सध्या या तीनही महिला डॉक्टर नायर हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

पायल तडवी प्रकरणातील तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर हे तिन्ही आरोपी काही दिवस फरार होते.

या 3 महिला डॉक्टरांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यामध्ये पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तडवी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *