Sun. Jun 20th, 2021

डॉ पायल तडवीचा जातीवाचक छळ केला; अहवालात स्पष्ट

काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी यांनी रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी पायलला तिच्या जातीवरून रॅगिंग केल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात पायलचा जातीवाचक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नायर रुग्णालयात जळगावहून आलेली डॉक्टर पायल तडवीने आत्महत्या करत जीवन संपवल्याची घटना घडली.

डॉ. हेमा अहुजा, डॉ भक्ती मेहरे, डॉ अंकिता खंडेलवाल अशा तीन  तीन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेत हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आले होते.

पायल तडवीच्या आत्महत्येनंतर चौकशी समिती तयार करण्यात आली होती.

या समितीने अहवाल वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाकडे सादर केला.

या अहवालात डॉ पायलचे जातीवाचक शब्द वापरून रॅगिंग केल्याचे स्पष्ट केले आहे.

समितीने तपासणी कशी केली ?

डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीमने नायर रुग्णालयातील अधिकाऱ्यांना, वैद्यकीय कर्मचारी, पारिचारीका, विद्यार्थ्यांची माहिती काढली.

यामध्ये ५१ पेक्षा अधिक जणांचे जबाब त्यांनी या अहवालामध्ये नोंदवले आहेत.

या अहवालात डॉ पायलचे जातीवाचक शब्द वापरून रॅगिंग केल्याचे म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *