Tue. Sep 17th, 2019

नायर रुग्णालयात रॅगिंगला कंटाळून एका डॉक्टरची आत्महत्या

0Shares

मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा नायर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरीष्ठकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून एका डॉक्टर युवतीने आत्महत्या करून जीवन संपवल आहे. आदिवासी कोट्यातून डॉक्टर पदवी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पायल ताडवीला वरीष्ठाकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जीवन संपवावे लागल आहे. नायर रुग्णालयातल्या तीन वरिष्ठ डॉक्टर महिलांविरुद्ध याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल तडवीवर तिच्या जातीवरून कमेंट केल्यामुळे या प्रकरणात अट्रोसिटी कायदा सुद्धा लागू करण्यात आला आहे. सध्या या तीनही महिला डॉक्टर नायर हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. मात्र पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

डॉ.पायल तडवी मूळची जळगावची असणारी पायल तडवी एका गरीब घरातून शिक्षणासाठी मुंबईत अली होती.

मुंबईतल्या नायर रुग्णालयात तीच शिक्षण सुरू होत. तीच नुकतच लग्नही झालेलं होत.

शिवाय नवरा विलेपार्लेमधल्या कुपर या प्रसिद्ध रुग्णालयात नोकरी करतोय.

पायल आदिवासी कुटुंबातून असल्यामुळे वरिष्ठ डॉक्टरकडून तिला मानसिक त्रास होत होता.

कँटीनमध्ये तिच्यावर कमेंट करणं, व्हाट्सअप ग्रुपवर तिला वाईट वाटेल अस बोलणं असे प्रकार वरीष्ठाकडून करण्यात येत होते.

मात्र या सगळ्याला कंटाळून पायल तडवी हिने आत्महत्या करणं सोयीस्कर समजलं.

22 तारखेला गळफास घेऊन तिने स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला.

तर पायलचे प्राण वाचले असते…

नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या सात ते आठ महिन्यापासून पायल तडवीला त्रास होत होता.

डॉक्टर हेमा अहुजा, डॉक्टर भक्ती मेहेर आणि डॉक्टर अंकिता खंडेलवाल या तिघी तिला त्रास देत होत्या.

त्या तीला जातीवाचक बोलत होत्या रिझर्वेशन कोठ्यातून निवड झाल्याबद्दल टोचून बोलत होत्या.

तू लहान जातीची आहे. तुला शिक्षण घेऊ देणार नाही. तुला प्रशिक्षण पूर्ण करू देणार नाही.

काम सोडून जेवायला का गेली. तुझे बत्तीस दात काढून टाकू अशा धमक्या देखील त्या देत होत्या.

नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे रॅगिंगबाबत १० मे रोजी तिने तक्रार केली होती.

स्वतः पायलच्या आईने वेळोवेळी जाऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

परंतु रूग्णालय प्रशासनाने याची दखल घेतली नाही. आणि पायलवर आत्महत्येची वेळ आली आहे.

आत्महत्येपूर्वी पायलचा आईला फोन

बुधवारी 22 मे तारखेला होस्टेलच्या आठव्या मजल्यावरील खोली क्रमांक 806 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना होण्याच्या काही तास आधी पायल आईला फोन करून सांगितलं होतं,की मला हा त्रास आता असह्य झालेला आहे

तिच्या सोबत राहणाऱ्या या डॉक्टर मुलींचा टॉर्चर प्रकार गंभीर आहे असं सांगून तिने गळफास घेतला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *